top of page
Search

Reunion

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

आयुष्याची पाने चाळता

शाळेच्या पानांत मन रेंगाळते...

सख्या सोबत्यांची पुनर्भेट

सुरेल गाणे घेऊन येते..


इथे फक्त झोकून द्यायचे

सावरायला कुणीतरी येते..

उदासवाणे वाटले तर

हासवायला कुणीतरी असते..


चुकलात कधी तर

समजावणारा कुणी असतो..

खिल्ली उडवणे हा तर

जन्मसिद्ध हक्क असतो..


स्मृतींच्या गल्ल्यांमधून फिरताना..

सकाळची दुपार होते..

पुन्हा उजळणी करताना

दुपारची रात्र होते..


खळाळणा-या पाण्यासारखे

स्वच्छंदी हे नाते..

Whats app च्या हातांनी

घट्ट धरलेले असते..


-विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page