top of page
Search

Situation

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

भरपेट जेवल्यावर कधीतरी

'जेवणार का?'विचारले जाते..

भूकेचे कावळे कथ्थक करताना

चहा मारी बिस्कीट समोर येते..


आइस्क्रीम पार्लरमधे गेल्यावर

घसा बसल्याचे लक्षात येते. .

आइस्क्रीम न खाताच

खोटे हसत परतावे लागते..


साधी भोळी होते तेव्हा

स्मार्ट मुलींना demand होती..

कष्टाने स्मार्ट झाले तेव्हा

म्हणे innocentच बरी होती..


मनातली पावले जेव्हा

मॅरेथॉन पळत असतात..

जिना उतरताना तेव्हा

गुडघे दुखत असतात..


Situation अशी माझ्या

180 डिग्रीत फिरत असते..

जरा थांबले मी तर

ती मला भेटू शकते...?


विनीता धुपकर

 
 
 

Comentarios


bottom of page