Search
अंगाई
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
जो जो रे जो जो बाळा
का नीज येईना डोळा..
थोपटतो चंद्र तालात
चांदण्यांचे अंगाई गीत
स्वप्ने पेंगुळली उशाला
का नीज येईना डोळा..
ठोठावी लबाड वारा
पापण्यांची इवली दारे
तोही झाडाशी पहुडला
का नीज येईना डोळा..
जागून सावल्या हलती
पाने डोळे मिचकावती
फांद्याही डोलूनि थकल्या
का नीज येईना डोळा..
झुल्याला सांगे गोष्ट
हातात पकडूनि बोट
आली बघ झोपही त्याला
का नीज येईना डोळा...
विनिता धुपकर
Comments