Search
अनमोल
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
अनमोल ते हात, ज्यांनी
अनंत आयुष्ये घडविली
आभाळाची छाया देऊन
सागराची माया दिली..
अनमोल ते डोळे, ज्यांनी
प्रकाशाचा ध्यास घेतला
रात्रीच्या अंधारात त्यांनी
उद्याचा दिवा लावला..
अनमोल ती पाऊले, ज्यांना
थांबणे माहित नाही
तप्त वाळूतही उमटती त्यांची
पदचिन्हे आशादायी..
अनमोल ते हासणे, ज्याने
अश्रुनांही हसविले
जीवन त्यांना कळले हो
तृप्तीची ही सदाफुले..
अनमोल तो देह, जो
रणांगणी समर्पित झाला
साऱ्या भारतवासीयांचे
साष्टांग नमन तुजला..
विनिता धुपकर
Comments