Search
अव्यक्त
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
किती काळ मूक सहिष्णूता
वेळीच व्यक्त होणे..
समाजाच्या भितीला
ढकलून पुढे येणे..
खेचा प्लॅस्टिक पिशव्या
फेका तोंडावर त्यांच्या..
कुरूप वसुंधरा देणारे
हाती लेकरांच्या..
किती काळ दाबणार
स्री अस्तित्वाचा गळा..
बस करा मक्तेदारी
आणि गनिमीकावा..
आता तरी बोल तू
असह्य अव्यक्तता..
आत्ता नाही तर
कधीच नाही
दिसणार तुझी व्यथा..
किती काळ लोटला
तू अव्यक्त देवळात..
कधी व्यक्त होणार तू
माणसांतल्या देवांत..?
अव्यक्तते तू
थांबव तुझा तोरा..
व्यक्ततेचे तोंड दाबून
तिचा कोंडमारा..
अंधा-या खोलीत ती
अजूनही घेतेय श्वास..
आतातरी सोड तिला
दाखव उद्याचा प्रकाश..
विनीता धुपकर
Comments