top of page
Search

अवकाश

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

विलक्षण गहि-या डोळ्यात

व्यापलेले अवकाश..

खोल, गूढ, एक गुहा

निघाली पावले सावकाश..

निर्वात पोकळीत कुठूनशी

ऐकू येते आर्त साद..

हलत्या पाण्यात तरंगणारा

हलका निळा निषाद..

जादुई दुनियेतला

दैवी स्वर्गीय श्वास..

विहरत अंतस्थ मनाचा

अनोखा अद्वितीय प्रवास..

लोटले कुणीतरी हलकेच

गुहेचे पापणी दार..

तेजस्वी तरीही प्रकाश

ब्रम्हानंद अपरंपार..

उमजे ना वाजवी कोण

तानपुरा छेडूनी तार..

स्वर षड्जाचा गंभीर

ओंकाराचा नाद..

दिसती वाटेवर चित्रे

मिसळली एकमेकांत..

नाही दारे खिडक्या

मुक्त विहार रंगात..

शब्दपाखरे बसली

खांद्यावर नकळताच ..

काव्यफुलांची ओंजळ

वाहिली निर्मात्यास ..

उघडले दार गुहेचे अन्

आले भान वास्तवात ..

ब्रह्मांड भ्रमंती डोळ्यांतून

स्वप्नांचा भास आभास..


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page