top of page
Search

अवचित

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

दाटलेल्या सायंकाळी

अवचित सोनेरी उन्हे पडली ..

तशीच काहीशी अगदी अलवार

प्रेमसुरांची तार झंकारली..

.

भिजलेल्या त्या संध्याकाळी

मिटता डोळे अवचित आली

कुठून आली, कुठे चालली

जाता-जाता कविता भेटली...


किती शोधले, कुठे हरवले

चित्र होते माझ्या स्वप्नातले ..

अवचित रंग रंगात मिसळले

अवघे चित्र भूवरी अवतरले


कंटाळवाण्या त्या दुपारी

अवचित कानी साद ऐकली ..

प्रतिभेची ती प्रतिमा होती

गोड संख्यांची सखी मिळाली...


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page