Search
आनंदभेट
- Vinita

- Mar 17, 2020
- 1 min read

कालची भेट यारदोस्तो
नवी न्यारी होती नक्की
नसलेल्यांसाठी तर अगदी
निसटलेली हळहळ पक्की..
नाव सांगत फिरत होतो
गळाभेटी हात मिळवून
मनाने मात्र कधीच सारे
ओळखले होते आतून..
काय आणि किती सांगू
का सूर आळवून गाऊ
किती आणि कसे हासू
की खूळ्यागत नाचत राहू..
हास्याची कारंजी उंच उंच
फुलत नि फुलवत होती
आनंदाच्या झ-यांखाली
सा-यांना भिजवत होती..
एकेक क्षण लाख मोलाचा
सारेजण वेचत होतो
मनाच्या आतल्या कप्प्यात
जपून त्यांना ठेवत होतो..
जगण्याची पालवी फुटून
निर्भेळ आनंद वाहत होता
सवंगड्यांनो हे क्षण सारे
पुन्हापुन्हा जगू या आता..
नीता सोमणी (धुपकर)
Comments