top of page
Search

आशिर्वाद

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 18, 2020
  • 1 min read

झोळी कायम भरलेली

अनंत आशीर्वादांनी..

त्यातूनच मार्ग दिसतो

जगण्याचा आनंदानी..


थोरा मोठ्यांबरोबर

लहानगेही गुरू..

त्यांच्या आशीर्वादानेच

तिसरा अंक सुरू..


डोक्यावर हात आहे

रंग आणि सुरांचा..

पाठीवर हात आहे

ओघळणा-या शब्दांचा..


एकदा हुंकार दिला होता

माझ्या गोजि-या नातीने..

तिच्या हस-या डोळ्यांतून

'तथास्तू' म्हणले देवीने..


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page