top of page
Search

उंबरठा

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

लग्नानंतर उंबरठयावरचे

माप ओलांडून घरात आले

तेव्हापासून उंबरठ्याने

मुलीसारखे मायेने जपले


घराबाहेर पडताना सांगे

काळजी घे, लवकर ये घरी

परतायची ओढ रूजलेली

कुठेही जगाच्या पाठीवरी


शिक्षणाच्या पंखाने उडताना

माझ्यावर तो नाराज होता

यशाचे शिखर पार करताना

सडा रांगोळीने सजला होता


सांभाळले त्याने घराला

आडवे येऊन दाराला...

भिंतींच्या नात्याला

छपराच्या छायेला..


देव्हा-यातील पावित्र्याला

स्वर्गीय कलेच्या सुंदरतेला

जपले त्याने मला आणि

*घराच्या घरपणाला*..


विनीता धुपकर


 
 
 

Comentários


bottom of page