top of page
Search

कोण माझे गुरू, कोणकोण माझे गुरू.l.

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

आई बाबा आजी आजोबा

आत्या मामा सारेच गुरू

बोलणे वागणे संस्काराचे

बाळकडू देणारे गुरू.l


शाळा काॅलेजात गुरूजनांनी

विद्येचे दान दोन्ही हातांनी..

श्रीमंत झालो लढा सुरू

सदैव रूणी तुमचे गुरू..l


मित्रमैत्रिणी बहिण भाऊ

सल्ले देऊन शिकवत राहू

सारेच उठवतात हात धरून

पडते जेव्हा मी कोलमडून..


तुमचा आधार सदोदित धरू

मित्र आणि सच्चे गुरू..l

कसे विसरू आॅफिसातले

ओरडणारे बाॅस सगळे..


पण त्यांनी कणखर केले

अवघड शिडीवर सहज चढणे..

यू आर ऑलवेज राइट सर

हॅट्स आॅफ टू यू सर..l


नवरा आणि मुलगी हे तर

प्रेमाच्या शिक्षणाची गुरूकिल्ली..

आवडेल अखंड भरून घेताना

शिष्याला प्रेमाची झोळी..l


मला आवरून सावरू

गंडा बांधलेले प्रेमळ गुरू..l

डोंगर द-या फुले झाडे

रोज शिकवतात आयुष्याचे धडे..


कविता आणि चित्रे गाणी

समृद्ध आयुष्य क्षणोक्षणी

अविरत शिक्षण सुरू

भेटे रोज नवा गुरू..


सारे आणि सगळेच गुरू

वंदन तुम्हांसी कसे करू..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page