top of page
Search

कधीतरी

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

आताशा असे काहीसे होते

कधीतरी स्मरण विस्मरणात जाते

चेहरे समोर ओळखीचे भासतात

मात्र, आठवणीत पुसटसे नाते..


आताशा असे काहीसे होते

कधीतरी कोणीतरी 'आजी' म्हणते

म्हणणाराही असतो आजोबा

टक्कल बेमालूम झाकलेले असते


आताशा असे काहीसे होते

कधीतरी गुडघ्यांचे भाषण सुरु होते

दिसत असते उंच शिखर डोळ्यांना

पण, झेप घेण्यास बळ नसते


आताशा असे काहीसे होते

कधीतरी विनाकारण अश्रुंचे भरते

असेल ते कोण्या काळाचे रडू

मोकळे व्हायचे राहिले होते


आताशा असे काहीसे होते

कधीतरी झोपेचे खूपच बिनसते

रात्रीची जाग, दिवसाची झोप

दूर कुठेतरी एकटी वाट दिसते...


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page