Search
गुलाबी थंडी
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
पहाटे उठून घराबाहेर
भेटशील का मला खास
गुलाबी थंडीकडे पाहून
फुटल्या ओठातून हास
तुझी सखी मी "थंडी"
पाहुणी काही दिवसांची
मलाही थोडी घेऊ दे
ऊब तुझ्या शालीची...
फुले मिरवी चमचमत्या
दवबिंदूंना अंगावर..
गारठलेले नाजुकसे
हसू येई पाकळ्यांवर..
सूर्य लपून बसलाय
धुक्याच्या पडद्यामागे..
त्यानेही चादर ओढलीय
गुलाबी थंडीमधे..
झाडे बिचारी शांत
थंडीने कुडकुडली..
नाही हिरवी दुलई
पाने सारी गळाली..
नको आता उशीर
बिलगून भेट मला..
माझ्या स्पंदनाने तुझ्या
सर्वांगाला शहारा..
गार वारे साठव तुझ्या
ह्रदयी मनमोकळे
सरतील माझ्या आठवणीत
उन्हाळे पावसाळे
विनिता धुपकर
Comments