Search
गोष्ट
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
मागून येऊन डोळे मिटले
ओळख बरे कोण?
ओळखीचे हात अन्
ओळखीचेच बोल..
वर्षांनंतर भेटलेली
मैत्रीण ही जूनी..
कुठे होतीस, कशी आहेस?
'कविता' तू नवी...!
हल्ली रोज येते ही
घेऊन शब्द एक..
गाऊ लागतात ह्रदयात
शब्द शब्द अनेक..
तुझ्या पूनर्भेटीने
दिसतय सारं स्पष्ट..
माझ्या मनात शिरून तू
सांगितली माझीच गोष्ट..
विनीता धुपकर
Comments