top of page
Search

गणपती बाप्पा मोरया

  • Feb 17, 2020
  • 1 min read

गणपती बाप्पा मोरया

पूढच्या वर्षी लवकर या..

येताना बुद्धीदाता अल्पशा,

बुद्धीचे वाटप करित या..


कर्णकर्कश भोंग्यांना,

ध्वनिप्रदूषण शिकवत या..

वाजत गाजत मिरवण्यापेक्षा,

हाताला हात देत अभिमानाने या..


येताना विघ्नहर्ता तुम्ही,

काळोखात प्रकाशआशा व्हा..

दुष्काळ -पूरादी संकट-मोचन,

सूख-मांगल्य घेऊन या..


नवा संकल्प, नवी आशा,

आम्हां विद्यारम्भा द्या..

नवा मार्ग, नवी दिशा,

नवी प्रेरणा, "श्री"लवकर या.

.

विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page