Search
चित्र
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
Updated: Mar 12, 2020
कधी

अचानक चित्र कोठूनी
स्वप्न होऊनी येते
कुणीतरी त्या चित्रामागून
मजसि खुणवित असते
स्वप्न व्यापूनी सर्व जाणिवा
गीत गाई ह्रदयात
कसे आणू मी विश्वच अवघे
चित्राच्या खिडकीत
द्वंद्व मनाचे गूढ मनाशी
उधळूनी रंग आकाशी
हलके अलगद चित्र अवतरे
धुक्यातून या क्षितीजी
चित्र मनातील रंगव आता
धवल शुभ्र पटलावर
कुंचल्या तुला दिसेल का रे
चित्र उभे क्षितीजावर
चित्रातूनी रंगले चित्र हे
मिठी मारूनी स्वप्नाला
मजला अजूनी कळले नाही
खुणवी कोण चित्राला
विनिता धुपकर
Comments