top of page
Search

चंद्र

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 12, 2020
  • 1 min read

चंदामामा होऊन बालपणी

लपला होतास लिंबोणीमागे

अलगद डोळे मिटले होते मी

हिंदोळा हलके झुलू लागे


तू मग अचानक भेटलास

एका खुळ्या चांदण्या रात्री

स्वप्नवत रोमांचित होते सारे

सुंदर प्रेमाची दिलीस खात्री


हल्ली तू भेटतोस मला

कविता आणि गाण्यातून

काळजाला भिडतोस अगदी

रडवतोस भिजल्या सुरांतून


मी मात्र नक्की केलंय

नाही सारखं भावूक व्हायचं

अंगाई नातीला गाता गाता

तुला पुन्हा लपायला लावायचं


विनीता धुपकर

 
 
 

Commenti


bottom of page