top of page
Search

चिमूटभर

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

चिमूटभर मिठासोबत

माया आभाळभर

म्हणूनच भाजीची चव

रेंगाळते जीभेवर..


चिमूटभर खोल तिची

गालावरची खळी ..

लाखात उठून दिसते गं

सौंदर्याची कळी..


चिमूटभर हलले ओठ

इवल्याशा बाळाचे

घरदार सारे हसले

तुषार आनंदाचे


चिमूटभर कुंकू तिने

लावले भाळी

शृंगारला चेहरा आणि

खुलली कळी..


चिमूटभर कोतुक होता

मणभर उत्साह..

एक चिमूट शब्द मिळता

कवितेचा प्रवाह...


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page