Search
चाहूल
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
वारा खुळा सळसळला
पानापानात..
त्याची चाहूल झंकारली
रोमारोमात..
चांदण्यांनी फेर धरला
मनाभाळात..
उमलून आला जीव
माझ्या डोळ्यात..
बासुरीचे सूर भिनले
दाही दिशात..
सप्तरंगी वादळवारे
आत हृदयात..
चित्त नसे थाऱ्यावर
येरझाऱ्यात..
हुरहूर नि थरथर
अंग अंगात..
आला क्षण जवळी गं
माझ्या पुढ्यात..
काळजाची धडधड
माझ्या कानात..
पापण्यांची किलबिल
श्वास श्वासात..
माझी मी ना राहिले
त्याच्या सहवासात..
विनिता धुपकर
Comments