Search
जागी रात्र
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
आज चांदणी
माझ्यासारखीच
रात्रीच्या घरात
जागी आहे..
रात्र पण
पापण्या न मिटता
मंद दिवे घेऊन
उभी आहे..
अशाच एका
जाग्या रात्री
आनंदवाटेने
आली होतीस तू..
आईपणाच्या जाणीवा
अणुरेणूत
जागवीत, फुलवीत
रूजवल्यास तू ..
किती रात्री
उलटून गेल्या
धावत्या कालचक्रात
कळलेच नाही...
कधी पाखरू
घरट्याबाहेर
दूरदेशी उडाले
उमगलेच नाही..
आज पुन्हा
जाग्या रात्री
चांदणी जागी
माझ्याबरोबर..
रात्र पण
पापण्या न मिटता
तशीच उभी
माझ्या सोबत..
विनिता धुपकर
Comments