top of page
Search

जीवन (2)

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

जीवन म्हणजे प्रवास

प्रत्येकाचा वेगळा..

पांथस्थ आपण चाललो

साजरा करित सोहळा..


नात्यांचे सूर आळवत

क्षितिज आपुले शोधावे..

सावलीत कधी झाडांच्या

स्वप्नाला आकाशी न्यावे...


आनंदसरी बरसल्यावर

खळखळून हसावे..

दाटून आले ढग तर

खुशाल मोकळे रडावे...


आकाशाच्या निळाईत

स्वत्व झोकून द्यावे..

फूलपाखरांना घेऊन

मनसोक्त बागडावे...


नदीच्या वाहण्यात

प्रवाही व्हावे..

फुलांच्या बहरण्यातून

हळूच उमलावे..


वाटेवरच सारे उत्सव

साजरे करत जावे..

प्रवास संपल्यावर काहीच

श्राद्धाला ना उरावे..


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page