top of page
Search

डोंगर-कडा

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

Updated: Mar 12, 2020

हळूहळू डोंगरांचे सुळे

'अतिदक्षता' पटलावर

पुढे पुढे सरकत होते..

नळ्यांच्या मुखवट्यामागे

निपचित पडलेला तो

हृदय मात्र बोलत होते..

जीवन-मरणाच्या

अनाकलनीय रेषेवर

असणे त्याचे

दोलायमान होते..


ree

शिखरे त्याला बोलावत होती

कडे कपारी

खुणावत होते..

अचानक डोंगर विरघळून

एक सरळ रेषा

सरकली..

कड्यांचे काळीज थरारले

कपारी अश्रू ढाळू लागली..

अंगाखांद्यावर खेळवले तुला

पण आज काहीतरी

चुकले होते..

शिखरांनी मान झुकवली होती

कड्यांनी हात जोडले होते..

माफ कर मित्रा,

झेलू शकलो नाही

गात मात्र राहू गाथा

तुझ्या शौर्याची..

वचन देतो आज तुला

काळजी घेऊ आम्ही,

तुझ्या अनंत

धैर्यवान शिष्यांची..


विनिता धुपकर




 
 
 

Comments


bottom of page