Search
दिपावलीच्या शुभेच्छा
- Vinita
- Feb 12, 2020
- 1 min read
अशीच येते हीच दिवाळी
हसूनी नटूनी मज दारी..
लक्ष दिव्यांच्या माळा घेऊन
स्वागत करु या घरोघरी..
लावता दिवे घरात आपुल्या
मांगल्य नि सौख्यासाठी..
एक दिवा हा नक्की लावू
सैनिक हो तुमच्यासाठी..
फक्त एकदा वर्षाकाठी
दिपते सारे तू येता..
ठेवशील का मनात तेवत
ज्योत एक जाता-जाता..?
विनीता धुपकर
Comments