top of page
Search

ध्वनी (2)

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

छम छम छमछमछम

पैंजणी घुंगरू निनादले..

ती आल्याची चाहूल आली

लय-तालावर पाऊले..


झन झन झनझनझन

तार सतारी झंकारली..

धून भिने रोमारोमात

मन धावे आनंदमेळी..

.

छन छन छनछनछन

छेडिल्या संतूर तारा..

चांदण्यांची लुकलुक

भारावून जीव गेला..


टप टप टपटपटप

थेंबांचा हा अविरत नाच..

आकाशातून पडती मोती

जमवू ओंजळीच्या शिंपल्यात..


कड कड कडकडाsट

वीज चमकली रागाने...

ध्वनी प्रदुषण नक्को बाई

शिक्षा होईल नियमाने...


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page