Search
नाताळच्या शुभेच्छा
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
सांता आजोबा ये रे
सांता आजोबा ये..
निळ्या निळ्या आभाळातून
लखलखत्या चांदण्यातून
दूर करून अंधार, नाताळ सजवित ये..
सांता आजोबा ये..
शुभ्र रूपेरी रथगाडी
चालवी हरणांची जोडी,
मऊ ढगांच्या वाटेवरून, घराकडे ये..
सांता आजोबा ये..
लाल झगा अंगावरी
लाल टोपी डोक्यावरी
शुभ्र किनार दाढीसम, काठी टेकवित ये..
सांता आजोबा ये..
आल्यावर नक्की भेट
विसरु नको वस्तूभेट
चांदीतल्या गोळ्यांतून, आनंद वाटत ये..
सांता आजोबा ये....
विनीता धुपकर
Comments