Search
निर्णय
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
आज ऐकले निर्णय झाला
हार ना झाली, नाही जीत
मंदिरही होणार आयोद्धी
आणि होणार मस्जिद
देव भेटणार म्हणे त्यांना
आपापल्या देवळात..
याचसाठी होता का
परमेश्वर कटध-यात..?
घेतले किती जीव त्यांनी
ध्यानी मनी एकच ध्यास..
थांबून थोडे पाहणार का
माणसांतला ईश्वरी वास..
कुठे चालला आहे माणूस
पुढे पुढे की वळून मागे..
कुठे लपला तो परमेश्वर
वैकुंठी की थडग्यामागे..?
विनिता धुपकर
Comments