Search
निसर्ग
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
गातो निसर्ग आनंद गाणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे

थेंबटपोरे पानी पडता
नुपूर वाजवीत नृत्य देखणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
मृदगंधाचे अत्तर घेऊन
वाऱ्याचे रानात वाहणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
रंग नभाचे लाल जांभळे
घेत फुलांचे संथ डोलणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
पक्षी मांडती गीत सूरांतुनी
ऊन कोवळे हसे दिवाणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
रात्र पांघरुनि दिशा गुंगल्या
गझल नभीची चंद्र-चांदणे
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
सूर-रंग मैफील सजलेली
तुझे (माणसा) नको बेसूर बहाणे...!
दिरदीरतोम तननन दितोम तराणे
विनिता धुपकर
Comments