Search
नव वर्षाचे आगमन
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
आगमन नव्या वर्षाचे
उधळण नव्या रंगांची
ओंजळभर फुले माझी
नव्या सानुल्या स्वप्नांची
कालची मरगळ उतरवून
आनंदवस्त्रे परिधानली
नवा आश्वासक श्वास
चैतन्य गंध भोवताली
आशेची प्रकाश किरणे
काळ्या ढगांना सारून
नव्या पालवी पानांवर
हिरव्या कथा लिहून
राग मांगल्याचे गाती
पक्षांची मधूर गाणी
वाराही कानांत सांगे
उद्याची प्रेम कहाणी
वसुधे तुझा विश्वास
राहू दे हात शिरावर
तुम्हा आम्हा सर्वांना
सदिच्छा आभाळभर...!
विनिता धुपकर
Comments