top of page
Search

पाऊलवाट

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

Updated: Mar 12, 2020


ree

रोजच्याच रस्त्यावर

खुणावणारी पाऊलवाट

हिरव्या पोपटी रंगांमधून

गेरूचा कुंचला वळणदार


मीही निघाले मागोमाग

शोधत एक नवे गाव

असेल का ते स्वप्नातले

पाऊलांना नसे ठाव..


मान बोलू लागली होती

ताडांची उंची मोजताना..

तुफानातही ताठ उभे

समतोल अचूक जपताना..


सूर्याचे लहरी प्रतिबिंब

शांत वाहत्या पाण्यावर

प्रतिबिंबाचे प्रतिबिंब

हलते पानांच्या देहावर..


हिरव्या छटांचे अंगरखे

हलवी पानांच्या झालरी

पाखरांची चलबिचल

ह्यावरून त्या झाडावरी..


अशाश्वत तरी आनंदवाट

जगण्याचा मंत्रपाठ

सावळ्या उदास दिवसातला

मोकळा हिरवा श्वास..


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page