top of page
Search

प्रीती

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 12, 2020
  • 1 min read

दिसे कधी ना कुणासी,

अनोखी प्रीत दोघांची..

बुद्धी-मनाचे अपार प्रेम

जोडी जन्मांतरीची..


कधी मनाचा हळवा स्वर,

करी घायाळ बुद्धीला..

थोपटून ती सावरते मग,

रडवेल्या त्या ह्रदयाला..


मिलनी समतोल साधण्या,

रोज कसरत दोघांची..

दिसतो सुंदर माणूस तेव्हा,

कथा सांगतो प्रीतीची..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page