Search
प्रतिक
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
आवडेल मला लिहायला
कागदावर लेखणी होऊन..
जर आलास मनातून माझ्या
'कविता' तू होऊन..
प्रतिक नव्या स्फूर्तीचे..!
ऊंच उंच झेप घेईन
पक्षी होऊन आकाशी..
बळ पंखांमधले जर
होऊन तू येशी..
प्रतिक आधार विश्वासाचे..!
सफेद पटलावरचा जर
झालास तू कुंचला..
उधळून देईन सा-या
रंगांमधल्या मला..
प्रतिक मुक्त विचारांचे..!
होईन मी आर्त सूर
शब्दांसवे गाण्यातला..
असशील तू जर तेव्हा
श्वास ह्रदयातला..
प्रतिक भावनेत समरसण्याचे..!
होऊ नकोस तू काल आणि
उद्याच्या स्वप्नांची अपूर्णता..
असेन जर 'इच्छा' मी,
होशील का तू 'पूर्तता'.?
प्रतिक अतूट प्रेमबंधनाचे..!
विनीता धुपकर
Comments