top of page
Search

प्रतीक्षा

  • Feb 18, 2020
  • 1 min read

दोन डोळे उभे

भेदरलेले..

प्रतीक्षेत आईच्या

शाळा सुटल्यावर

रडवेले..


दोन डोळे उभे

आसुसलेले..

आकाशाकडे पहात

वरुण राजाच्या

आगमनासाठी

पाणावलेले..


दोन डोळे उभे

आतुरलेले

दाराकडे तेल घालून

रणभूमीवरून

तो परतण्यासाठी

धास्तावलेले...


दोन डोळे उभे

उदासलेले...

आयुष्याच्या संध्याकाळी

परतीच्या वाटेकडे

डोळे लावून

मार्गस्थलेले!


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page