Search
प्रशांत
- Vinita
- Feb 18, 2020
- 1 min read
मी भान हरपूनि, गात राहिले,
विसरून रे सिद्धांत..
तू नकळत घेई, ठाव मनाचा,
शांतपणे प्रशांत..
रवि तो ढळला,क्षितीजावरती,
कळली न आली रातं..
हलके हिंदोळा, झुले मनाचा,
हाती घेऊन हात..
तारका लेवूनी, चमचम वस्त्रे,
हितगुज करि निवांत..
तू नकळत घेई, ठाव मनाचा,
शांतपणे प्रशांत..
सावध मजला, करी मी शतदा,
गुंतू नको गुंत्यात..
परि कसा मी, विणला अलगद,
गुंता रे नात्यात..
गुंत्यातच मी, फिरते रमते,
मिळे इथे विश्रांत..
तू नकळत घेई, ठाव मनाचा,
शांतपणे प्रशांत..
विनिता धुपकर
Comments