Search
पडते तारे
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
ओंजळीत जमा करू या सारे किना-याकाठचे पडते तारे.. मुठीच्या शिंपल्यात तारांचे मोती जपून ठेवू वादळी दिवसासाठी..
ठेवले तिने डोके खांद्यावर, अंधा-या एका अमावस रात्री.. तर असू द्या शिंपल्यातले तारे, दाखवायला तिला उद्याची खात्री..
उन्हाचे चटके, घामाच्या धारा, हालेना सावट, मिळेना थारा.. बरसेल पाऊस, भिजेल सारे, आशेचा किरण दाखवतील तारे..
ओंजळीत जमा करू या सारे किना-याकाठचे पडते तारे..
Catch those falling stars Put them in your pocket safely.. Each drop will gift you a life On a dry day with a smiley
विनीता धुपकर
Comments