Search
बंधन-3
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
मनी तुझा ध्यास, भेटी लागे आस
पाऊलांची वाट, पंढरपुरा..
कष्टाचे डोंगर, पेलुनीया माथी,
नाव तुझे ओठी, पांडुरंगा...
तूच रे सोबती, संकटे जाणसी
तूच पाठीराखा, विठुराया...
तुज का दिसेना, शेते कुजलेली
पाडतोस पाणी, कार्तिकीला...
उभा विटेवरी, हात कटीवरी
डोळे उघडे की, मिटलेले..
तुझिया बंधनी, अडकलो आम्ही
जाग या भक्तीसी, विठ्ठला तू ..
विनिता धुपकर
Comments