top of page
Search

बंधन_2

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 12, 2020
  • 1 min read

हे बंधन गं भिजलेले

एकाच खुळ्या छत्रीतले..

हात एक-एक भिजवून

दुस-याने सावरलेले..


हे बंधन हिरमुसलेले

लपलेल्या चंद्रावरले

विरहाने कोसळलेले

मिलनाने शहारलेले


हे बंधन गं मुरलेले

संसारी बरणीमधले..

आंबट नि गोडं स्मृतींनी

ताजेपण टिकवलेले..


हे बंधन गं गुंतलेले

पीळ घट्ट जणू दोरीतले..

पीळ सुटता सुटणे नाही

श्वासातच श्वास अडकले..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page