Search
ब्रह्मांड
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
कधी कधी असे का?
काहीच कळत नाही
ब्रह्मांड पालथले तरी
उत्तर गवसत नाही
सावली देणारे उन्हाशी करार
करतात की नाही?
सावलीला उन्हाचे चटके
बसतात की नाही..?
उसळणाऱ्या लाटांना
निमूटपणे झेलतो किनारा
मात्र, परवाना कोणाचा
तुफानाला लागत नाही..
पानांना वाऱ्याची तक्रार
करता येत नाही
नदीला प्रवाहाविरुद्ध
जाता येत नाही..
जरी उडाला माणूस
पक्षासारखा आकाशी
दोन श्वासांतील अंतर
वाढवता येत नाही..
नियतीच्या मनात लिहिलेले
वाचता येत नाही
ब्रह्मांडाचे कोडे तुला
सोडवता येत नाही..
विनिता धुपकर
Comments