top of page
Search

मांगल्य

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

लख्ख दिव्यांच्या प्रकाशाने

धरती नटली उजळली..

आकाशातील ता-यांनीही

कौतुके भुवई उडवली..


प्रेमदिव्यांच्या माळा सजल्या

अंधाराने काढला पळ..

प्रकाशमय जीवन व्हावे

आनंदाचा साज निखळ..


लावता दिवे घरोघरी

सर्व मांगल्यासाठी..

एक दिवा नक्की लावा

सैनिक हो तुमच्यासाठी...


--विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page