top of page
Search

मंगलाष्टक

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

माला मंगल धरोनि ही वधुवरा, वंदू श्री मोरया

सोन्याचा दिन मुहूर्त आज सजला, विघ्नेश्वरा पुजू या


सनई आळवुनी तया शुभस्वरा, तल्लीन हा चौघडा

अंतरपाट मध्ये असेच आपुल्या, नच रे दिसे तू मला


पाहे लाजुनी अमृता हळूच सजूनी, तोही बघे वाकूनी

देऊ साथ धरोनि हात सखया, आशिष रे घेऊनी


सहचरिणी तू असे तयास धरुनी, साता जन्मातुनी

बांधे रेशीमगाठ घट्ट तुझिया, शेल्यास आनंदूनी


आता सावध सावधान घटिका, संपन्न हा सोहळा

सुमनांचा अभिषेक हा शिरीवरी, बघ अमृता जाहला


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, कुर्यात सदा मंगलम...

शुभ मंगल सावधान...


 
 
 

Comments


bottom of page