Search
माझ्या मनीची दिवाळी
- Vinita
- Feb 17, 2020
- 1 min read
कसे करणार स्वागत ?
मी आलेय दारात..
फटाक्यांच्या आवाज
की सुरेल गाणे सुरांत..?
नको नको तो आवाज
कर्कश्य आतिषबाजी..
झोपलंय लेकरु
आजारी आहेत आजी..
कुठेच दिसत नाही
चांदणं आकाशात..
चंद्र झाकलाय बघा
धूरांच्या आभाळात..
वीजेच्या दिपमाळा..
डोळे दिपले दारात
एक तरी पणती लाव
अंधारल्या घरात..
जगवायची आहेत तुला
सुकलेली फुले वेलींची..
पर्यावरण जपलेस तर
खरी दिवाळी सर्वांची ..
विनीता धुपकर
Comentarios