top of page
Search

रांगोळी

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

घंटानादासवे पहाटे

प्रेमाचा सडा शिंपडला

गेरूने लिंपण घालून

तुळशीशी दिवा लावला


ठिपके एकेक देताना

भूपाळीचे सूर मुखांतून

गेरूचे आकाश बहरले

ठिपक्यांच्या तारकांतून..


थेंबाशी थेंब जोडला

जशी जोडली नाती

ललना उभी राहिली

रंगांच्या लेण्यासाठी..


नेसली तिने मग वस्त्रे

सप्तरंगी इंद्रधनुष्याची

दिसे अप्सरा जणू ही

त्या इंद्राच्या स्वर्गाची..


सूर्याने बघा उधळली

सोनेरी किरणे तीजवर

लखलखले नि चमचमले

लक्ष दागिने रांगोळीवर..


विनीता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page