Search
रोप्यमहोत्सव जोडीचा..
- Vinita
- Feb 17, 2020
- 1 min read
तुम्हा उभयतांच्या सहजीवनाचा,
रौप्यमहोत्सव सजला आज..
तुमच्यासाठी अपूराच आहे
शब्दांचा हा गुंफलेला साज..
हातात हात घालून आली,
एकसष्ठी ही वीणेची..
चंदेरी ढगाला चमकती,
किनार जणू हि-यांची..
संसार-रथाच्या नागमोडी वळणांवर,
एकमेकां तुम्ही सावरले..
अन् सावरताना आवर्जून,
सा-या नात्यांनाही जपलेले..
ओंजळ तुमची कायमच,
भरलेली संस्कार-फुलांनी,
आधार दिला नेहमीच
विश्वासाच्या हातांनी..
बळ दिले त्याने पंखांना,
आकाशात ती झेप घेताना..
धाडस केले होते तिने,
तिच्यातल्याच तिला शोधताना..
वळून मागे आजवरी
बघतो तो जेव्हा केव्हा...
दिसते ती सावलीसारखी,
खंबीर उभी तेव्हा तेव्हा..
दीर्घ आयुष्य लाभो तुम्हा,
पूर्ण व्हावी शंभरी..
लक्ष लक्ष आनंदतारकां,
बरसू दे तुम्हांवरी..
विनीता धुपकर
Comments