Search
वाटचाल
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
Updated: Mar 12, 2020

सहज सुंदर वाटेने चालताना
अचानक फुटल्या दोन वाटा
एक रोजची सोपी सरळ
दुसरी खडकाळ बोचणारा काटा
संभ्रम मनाला कुठे जाऊ?
नेहमीचा रस्ता नको तिढा
अंतर्मन मात्र ढकलत होते
घे आव्हान उचल तो विडा
गर्दी केली सा-यांनीच तिथे
साध्या सरळ मार्गाला
तू एकली चाल भिडवत
नजर संकटांच्या नजरेला
झेल ती थरारती वीज
निधड्या तुझ्या ह्रदयावर
आत्मविश्वासाच्या दोरीला धरून
चढ यशाच्या पाय-यांवर
आतला आवाज ऐकला होता
चालले अवघड वाट हट्टाने
आयुष्याची वाटचाल अति सुंदर
ऊन पाऊस वादळांच्या संगतीने..
विनिता धुपकर
Comentarios