Search
विहीर
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
कोरड्या विहीरी
कोरड्या नजरा
आटले पाणी
सुकली धरा
नसे निसर्गकोप हा
माणसाचेच कर्म
सिमेंटची जंगले
स्वार्थाचा धर्म
सूर्य संतापला
आता तरी थांब
वाऱ्याचा अबोला
पावसाचा नाही ठाव
चेहरा झाकुन तू
कुठे फेडणार पाप
आता भोगणे आहे
निसर्गाचा शाप
आतातरी शहाणा हो
फुलव निसर्गबाग
भरतील साऱ्या बारी
झाडांना येईल जाग..
विनिता धुपकर
Comments