Search
शिल्प
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
एक सुंदर शिल्प
आत्मिक समाधानाचे..
प्रयत्न असतो रोज
मूर्त साकारायचे..
उधाणलेल्या सागराला
मुठीत आणायचे..
ढगांना अलगद धरून
किरणांनी रंगवायचे..
उदास वाऱ्याला
बासुरीतून न्यायाचे..
गोंधळलेल्या दवबिंदूला
फुलांवर बसवायचे..
पारंब्यांच्या केसांची
वेणी घालण्याचे..
वादळ वाऱ्याला मिठीत
शांत करण्याचे..
शांत वाहत्या झऱ्याला
थोडेसे चिडवायचे..
ओबडधोबड दगडाला
मायेने आकारायचे..
मातीच्या ज्ञानगोळ्याला
कंगोरे द्यायचे..
बहुआयामी शिल्प साकार
सत्यातले हृदयाचे...
एक सुंदर शिल्प
आत्मिक समाधानाचे...
विनिता धुपकर
Comments