Search
स्मरण
- Vinita
- Mar 17, 2020
- 1 min read
तूला भेटण्याची
आतूर ओढ सहावेना
क्षण नि क्षण आज
काही केल्या सरेना़...
चार तपं दरम्यान
प्रवाहासोबत वाहून गेली
स्मरणपटातली तेव्हाची तू
आज दिसत राहिली..
स्मरतंय गं दोघींनी
वाटून सारं घेतलेलं
केसातले फूल तू काढून
माझ्या वेणीत खोवलेलं..
स्मरतील का तुला कथा
रात्र संपूनही न संपलेल्या
बंद मुठी अलगद
एकमेकींसमोर उघडलेल्या..
एकही क्षण तेव्हा
जात नसे तुझ्याशिवाय
कशी लोटली वर्षे
साध्या आठणीशिवाय..
कुठल्या गुंत्यात अशा
अडकत गेलो..?
आपलीच ओळख का
हरवून बसलो...?
आता एक घट्ट मिठी
कधीही न सुटणारी
साचलेल्या अश्रूंना
आनंदवाट देणारी..
आज मात्र मी एक
गुपित सांगणार तुला
तुला जो आवडायचा ना
तोच आवडायचा मला..
Comments