top of page
Search

सरोवर

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

खळबळ असे मनसागरात

घोंघावणा-या विचारांची

एकामागून एक खडकावर

आदळणा-या लाटांची..

आपसूकच शांत होई

कल्लोळ किना-यास भेटताना

रोजचाच खेळ मनाचा

तरूणाईच्या उर्मीत भिजताना..


मध्यान्ह मन नदीसारखे

प्रवाहाबरोबर वाहणारे

कधी खळाळून हसणारे

कधी संथ मुसमुसणारे..

झ-यासोबत हात धरून

कडेकपारीतून हिंडणारे

खडकांमधून ठेचकळत

आपली वाट शोधणारे


संध्याकाळचे मन सरोवर

शांत नीळेशार स्थिरणारे

आयुष्याचे आभाळ चित्र

पाण्यावर उतरवणारे..

दूर दूर क्षितीजावर

आकाशाला भिडणारे

समाधानाच्या कमळांवर

सुखचंदेरी किनार चमकवणारे...


विनिता धुपकर


 
 
 

Yorumlar


bottom of page