Search
हिरवाई
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
पाचूच्या हिरव्या वाटेवर
घट्ट मिठी हिरवाईची
माहेराची हिरवी शाल
अंगावर लपेटून ऊबेची...
मायेचा गारवा तिच्या
हिरव्या ओल्या गाभ्यात
शिणल्या मनाने साठवले
हिरवे श्वास हृदयात..
फांद्यावरती पाखरांची
हिरवी किलबिल कहाणी
हिरवा चुडा पानांचा अन्
हिरवी कंच पैठणी..
जळात हिरवी थरथर
हिरवाई नभांगणी..
वृक्षवल्ली सुरात गाती
हिरवी मंजुळ गाणी...
असेच व्हावे जीवन
मंगलमय नि हिरवेगार..
हिरवे तोरण दारावरती
घर हिरवाईत नदीपार..
विनिता धुपकर
Comments